Saturday, May 9, 2009

हे करुन पहा

रस्त्यावरुन जात असताना विनाकारण भुंकणारं कुत्रं : त्याच्याकडे बघायचं आणि त्याला आव्हान द्यायचं. म्हणजे नेमकं काय करायचं ? तर त्याचं भुंकणं संपलं कि आपण हलकासा आवाज करायचा, फक्त कुत्र्याला ऐकु येइल एवढाचं. तो परत भुंकायला चालु करतो... असं तुम्ही कितीहि वेळ करु शकता... (खबरदारीची सुचना : शक्यतो हा खेळ साखळीला बांधलेल्या कुत्र्यांबरोबर खेळावा)

घरात कोणीही नसताना तुमचे आवडते गाणे (तारसप्तक हवाचं) मोठ्या आवाजात म्हणावे... (आईशप्पथ याच्यासारखा दुसरा आनंद दुर्मिळ...)

जोराचा वादळ आहे, सोसाट्याचा वारा सुटलाय, ढगांचा गडगडाट , विजांचा कडकडाट आणि बेफाम पाउस... गच्चीवर जा... आव्हान स्वीकार त्या जगन्नियंत्याचं... आकाशाकडे तोंड करुन वारं आणि पाउस अंगावर झेलित उभा रहा...वेड्यासारखा हसत रहा... झेललेल्या प्रत्येक थेंबाची पोचपावती तुझ्या चेहर्यावर दिसु दे... पाऊस संपल्यावर विजयोन्मादाची गर्जना कर... यापुढं पाऊस बघताना भजीची आठ्वण होणार नाही.

No comments:

Post a Comment